राजकीय

शिराळा भुईकोट किल्ला येथील छत्रपती संभाजीमहाराज नियोजित स्मारकासाठी 50 लाखांचा निधी मंजूर – खासदार धैर्यशील माने.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी 

येथील भुईकोट किल्ल्यावरती होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या नियोजित स्मारकासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यात ५० लाख रुपयांचा निधी नगरविकास खात्याकडून मंजूर झाला असल्याची माहिती धैर्यशील माने यांनी दिली.
याबाबत माहिती देताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, शिराळा तालुक्याला प्रचंड मोठा असा ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना मुघलांच्या तावडीतून सोडवण्याचा एकमेव प्रयत्न शिराळा येथे झालेला होता. ते शौर्य आठवणीत राहावं आणि येणाऱ्या पिढीला हा इतिहास माहिती व्हावा या उद्देशाने मुख्यमंत्री उद्घव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत ही माहिती दिली होती. त्यांनी तात्काळ नगरविकास खात्याकडून स्मारकाच्या प्राथमिक कामाला निधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.
याचबरोबर आमदार मानसिंगराव नाईक, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील आणि मी स्वतः सातत्याने प्रयत्नशील आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरती प्रयत्न करून पहिल्या टप्प्यात नगर विकास खात्याकडून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. उर्वरित निधी सर्वांच्या प्रयत्नाने टप्या टप्याने मंजूर करून घेऊ छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य स्मारक त्यांच्या कीर्तीला साजेसं व्हावं या हेतूने आम्हा सर्व लोकप्रतिनिधी मंडळींचा प्रयत्न असणार आहे. लवकरच वास्तुविशारद यांच्याकडून प्रस्ताव येताच स्मारकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. शिराळा शहरच्या वैभवात भर घालणार आणि शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून हे स्मारक भविष्यात नावारूपास येईल असेही धैर्यशील माने शेवटी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!